मनोरंजन
विशाखा सुभेदारचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामधून रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी विशाखा सुभेदारला राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विशाखाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विशाखाने आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, सहकलाकारांचे आणि परिवाराचे आभार मानले आहेत.
पुण्यातल्या सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य : विशाखा सुभेदार / फेसबुक)