विशाल निकमने साैंदर्या बाबत केली ही पोस्ट!

विशाल निकमने साैंदर्या बाबत केली ही पोस्ट!

Published by :

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालूक्यातील विशाल निकम हा 'बिग बाॅस मराठी:३' चा विजेता ठरला. त्यापुर्वीही विशालने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिथुन' ह्या मराठी चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर त्याने 'साता जल्माच्या गाठी', 'दख्खनचा राजा ज्योतिबा' व 'जय भवानी जय शिवाजी' ह्या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहीला.

बिग बाॅस च्या घरात असताना विशाल निकमने अनेकदा 'साैंदर्या' नावाच्या मुलीचा उल्लेख केला होता. आता ही साैंदर्या नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय. विशालला हा प्रश्न मुलाखतींमध्ये अनेकदा विचारला देखील गेला आहे. परंतू, विशाल दरवेळी ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो.

मात्र आता विशालने स्वतः सोशल मीडिया वर पोस्ट करत साैंदर्या बद्दल चर्चा न करण्याचं आवाहन केलं.

"मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर आणि काही खाजगी गोष्टी सुरळीत झाल्यावर मी स्वत:हून सौंदर्या चं नाव सांगेल. ती एक समान्य मुलगी असून, अभिनय क्षेत्रासोबत तिचा काही एक संबंध नाही, त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जोडू नका. कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. प्लीज धीर धरा. मला वेळ द्या." हा मजकूर असलेली पोस्ट त्याने इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com