विवेक ओबेरॉयची तब्बल दीड कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

विवेक ओबेरॉयची तब्बल दीड कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा बळी ठरला आहे. विवेक ओबेरॉयची तब्बल १.५५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा बळी ठरला आहे. विवेक ओबेरॉयची तब्बल १.५५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्याच्या सीएने पोलिसात दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत विवेकने अनेकांची नावे घेतली आहेत. यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, चित्रपट निर्मात्यासह तिघे आरोपी विवेकचे व्यावसायिक भागीदार होते. त्यांनी त्याला एका कार्यक्रमात आणि चित्रपट निर्मिती फर्ममध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. पण तो पैसा त्याने आपल्या वैयक्तिक कामासाठी वापरला. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. विवेकसोबत ही फसवणूक गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाली होती आणि आता एमआयडीसी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, विवेक ओबेरॉय शेवटचा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती. पण त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com