Madhurani Gokhale Prabhulkar: अरुंधती म्हणजेच मधुराणी राजकारणात प्रवेश करणार का? जाणून घ्या...
अरुंधती म्हणजेच मधुराणी ही सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे खुप चर्चेत असते. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मधुराणीने नुकत्याच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. या सगळ्या प्रश्नाच्या मालिकेत मधुराणी राजकारणात येईल का? असे तिला विचारण्यात आले. यावर उत्तर देत मधुराणी म्हणाली की, 'नाही, अजिबात नाही. मी यासगळ्यांपासून लांबच राहते. मी इव्हेंट करतच नाही.
मला असं वाटते की मी अभिनय करायला आले आहे. त्याच्यावरचा माझा फोकस हलता कामा नये. त्यामुळे मी इव्हेंट करत नाही. माझ्यापर्यंत कोणतेही पक्ष अजूनपर्यंत आलेले नाही आणि येतील असं देखील वाटत नाही. कलाकार म्हणून मरेन पण राजकारणी नाही होणार. जर महिला सक्षमीकरणासाठी काम करायचे असेल तर ते मी माझ्या माध्यमातून करेन. त्याच्या राजकारणाशी माझा काहीही संबंध नसेल.