Gulzar : वयाच्या 90 व्या वर्षी गुलजार 'ज्ञानपीठ पुरस्कारा'ने सन्मानित
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, जो दरवर्षी भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत दिला जातो. साहित्यक्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल दिल्या जाण्याऱ्या या पुरस्काराला साहित्य क्षेत्रात खुप महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाचा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक गुलजार यांना जाहीर झाला . दिल्लीत झालेल्या सोहळ्याला गुलजार जी तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुंबई येथील वांद्रे येथील निवासस्थानी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार 90 वर्षांच्या प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार गुलजार यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या आजारपणामुळे ते दिल्लीतील या सोहळ्याला उपस्थित राहू शकले न्हवते. त्यामुळे भारतीय ज्ञानपीठचे विश्वस्त मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि महाव्यवस्थापक आर. एन. तिवारी यांच्या उपस्थितीत गुलजार यांना त्यांच्या राहत्या घरी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांना प्रशस्तिपत्रक, 11 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच वाग्देवी सरस्वतीची कांस्यमूर्ती पुरस्कारास्वरूप देण्यात आली. हा पुरस्कार स्वीकारताना गुलजार यांचे जावई गोविंद सिंधू , त्यांच्या'पत्नी रेखा, चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि अन्य काही साहित्यिक या वेळी उपस्थित होते.
गुलजार यांचे खरे नाव संपुरन सिंग कालरा असे होते. हेच टोपण नाव त्यांची ओळख बनले. जागतिक दर्जाचे उर्दू कवी म्हणुन नावाजलेल्या गुलजार यांनी परिचय , माचिस , हुतूतू, कोशीश , आंधी यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर मैने तेरे लिये (आनंद) छय्या छय्या (दिल से ), हायरत ए आशिकी (गुरु) यांसारख्या असंख्य गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे .
गीतकार गुलज़ार यांना यापुर्वी ही 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभुषण पुरस्कार , 2008 मध्ये स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी अकादमी आणि ग्रॅमी पुरस्कार तसेच चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा 2013 मधील दादासाहेब पुरस्कार ही मिळाला आहे.