Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिक पाचव्यांदा होणार बाबा; दुसरी पत्नी कृतिका मलिकने दिली गुडन्यूज

Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिक पाचव्यांदा होणार बाबा; दुसरी पत्नी कृतिका मलिकने दिली गुडन्यूज

अरमान मलिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Published by  :
Team Lokshahi

अरमान मलिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 4 मुलांचा बाप झाल्यानंतर अरमान मलिक आता पाचव्यांदा बाप बनणार आहे. यूट्यूबरची दुसरी पत्नी कृतिकाने नुकतीच तिच्या ब्लॉगवर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. यूट्यूबरच्या पत्नीच्या गरोदरपणाची बातमी पुन्हा चर्चेत आली आहे कारण कृतिकाने अवघ्या 5 महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला होता.

कृतिका दुसऱ्यांदा आई होणार आहे

अरमान मलिकची(YouTuber Armaan Malik) दुसरी पत्नी कृतिकाने यूट्यूबवर तिच्या ब्लॉगवर पुन्हा तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. कृतिकाच्या या घोषणेनंतर केवळ अरमान मलिकच नाही तर त्याची पहिली पत्नी पायलही खूप खूश आहे. ब्लॉगमध्ये तिघेही खूप आनंदी दिसत होते. कृतिकाने अवघ्या 5 महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला असून, तिचे नाव तिने अयान ठेवले आहे.

कृतिकाच्या या घोषणेने अरमान आणि त्याची पहिली पत्नी आनंदी असतानाच या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. कारण कृतिकाने 5 महिन्यांपूर्वी अयानला जन्म दिला होता. सोशल मीडियावर लोक इतक्या लवकर पुन्हा आई बनल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका त्यांच्या ब्लॉगमधून खूप कमावतात. या आनंदाची बातमी घेऊन अरमान मलिक पाचव्यांदा बाप होणार आहे. याआधी अरमान मलिकला पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला होता. त्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नी एकत्र गर्भवती झाल्या. पायलने दुसऱ्यांदा जुळ्या मुलांना जन्म दिला तर कृतिकाने एका मुलाला जन्म दिला. आता कृतिकाने पुन्हा गर्भधारणेची घोषणा केली आहे. ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com