KaranVeerMehra
KaranVeerMehra

Bigg boss: अभिनेता करणवीर मेहराने उचलली बिग बॅासची ट्रॅाफी, म्हणाला...

करणवीर मेहरा ठरला बिग बॉस १८ चा विजेता! ५० लाख रुपये बक्षीस आणि चाहत्यांचा पाठिंबा मिळवून त्याने जिंकली ट्रॉफी. वाचा संपूर्ण बातमी!
Published by :
Team Lokshahi
Published on

लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १८ या पर्वाचा विजेता अखेर घोषित झाला आहे. गेल्या १५ आठवड्यांच्या प्रवासानंतर अभिनेता करणवीर मेहराने बिग बॅासची ट्रॅाफी उचलली आहे, तर विवियन डिसेना हा उपविजेता ठरला आहे. या १५ आठवड्यांच्या शोमध्ये सुरुवातीला १८ सदस्य सामील झाले होते. नंतर ५ सदस्य वाइल्ड कार्ड म्हणून आले होते. सर्व सदस्यांना मागे टाकत करणवीर मेहरा बिग बॅास१८ चा विजेता ठरला आहे.

विजेता करणवीर मेहरांच्यासोबत या चुरसीच्या लढाईत चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व ईशा सिंह हे टॉप सहा सदस्य होते. या सहापैकी सर्वात आधी ईशा सिंह विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाली. त्यानंतर चुम दरांग व अविनाश मिश्रा बिग बॉसच्या घराबाहेर पडले. तिसऱ्या क्रमांकावर रजत दलाल बाद झाला, त्यानंतर विवियन डिसेना व करणवीर मेहरा हे दोन सदस्य होते. अखेर करणवीर विजेता असल्याची घोषणा होस्ट सलमान खानने केली.

बिग बॅास विजेता करणवीर मेहरांने केली सोशल मीडियावर पोस्ट

बिग बॅास विजेता करणवीर मेहरा यांने आपल्या सोशलमीडियावरती पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये करणवीर, आई, बहीण दिसत आहे. इंस्टाग्रामच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आपण सर्व ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आला आहे! JANTA KA LAADLA ने #TheKaranVeerMehraShow उर्फ ​​#BiggBoss18 जिंकला आहे बिग बॉस 18 का अस्लीहिरोच्या पाठीशी आणि वचनानुसार ट्रॉफीसह परतला आहे. तटस्थ प्रेक्षकांची खरी ताकद तुम्ही सर्वांनी दाखवून दिली आहे. #KVMNation आणि #KaranKeVeeron, हा विजय तुमचा आहे. दुसरी ट्रॉफी देखील आता घरी आहे आणि ती नेहमीपेक्षा अधिक चमकत आहे! उत्सव सुरू होऊ द्या! आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आला आहे! जनतेच्या लाडक्याने हा द करणवीर मेहरा म्हणजे बिग बॉस 18 हा शो जिंकला आहे, असं त्याने पोस्ट टाकत आनंद व्यक्त केला आहे.

करणवीर मेहराने बिग बॅासच्या आधी कलर्सवरील‘खतरों के खिलाड़ी 14’या रिअॅलिटी शोचा विजेता राहिला होता. नंतर तो बिग बॅासमध्ये सहभागी झाला होता. या ३ महिने चाललेल्या शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत या शोचा विजेता म्हणून त्याने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

बिग बॉस जिंकल्यानंतर करणवीरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. ‘बिग बॉस 18’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर, करणवीर मेहराने मीडियाशी संवाद साधला. त्याने पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला, “मी खूप खूश आहे, खूप जास्त, तुमचा खूप पाठिंबा होता. चाहत्यांनी दिलेला पाठिंबा, त्यांनी दिलेली मतं आणि घरातील माझी काही चांगली नाही, यामुळेच मी जिंकू शकलो.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com