Pushpa 2 Actor Allu Arjun Arrested: 'पुष्पा'फेम सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, नेमकं प्रकरण काय?

'पुष्पा'फेम अल्लू अर्जुनला अटक! 'पुष्पा 2'च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय आहे?
Published by :
Team Lokshahi

अल्लू अर्जुनच्या पुष्पानं जोरदार धमाका केला होता. आता त्याचा सिक्वल पुष्पा 2 नं देखील बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 5 डिसेंबरला रिलिज झालेल्या 'पुष्पा २' नं देशभरात तब्बल 164.25 कोटींचा गल्ला जमवत कमाईचे नवे रकॉर्ड तयार केले आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शित होताच त्यांच्या संबधीत अनेक घटना होत गेल्या,

ज्यामध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याला अटक करण्यात येत आहे. पुष्पा 2च्या अनुशंगानं सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीचं प्रकरण घडलेलं होतं आणि याच चेंगराचेंगरीच्या प्रकरणी कारवाई करण्यासाठी अल्लू अर्जुनला आता अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com