पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला झटका.. ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान
दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्याप्रकरणी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने दिलेल्या माहितीत पाकिस्तानचे ग्रे लिस्टमधील नाव कायम आहे. एफटीएफने पाकिस्तानला दिलेल्या २७ पैकी ३ निकष पूर्ण करण्यास अपयश आले आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
एफटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानकडून काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र या संस्थेनेस दिलेल्या २७ पैकी एकाही निकषातून पाकिस्तानला बाहेर पडता आलं नाहीय. एफटीएफचे प्रमुख मार्कस प्लियर यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना, व्यक्तींवर बंदी, निर्बंध घातले आहेत. त्याशिवाय, दहशतवादी हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम यांच्या अनेकजणांवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. पॅरिस येथील 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेने जून २०१८ मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवले होते.