Gold-Silver Price | दोन दिवसांत सोन्याचा भाव हजार रुपयांनी घसरला
कोरोनाची दुसरी लाट ओसरताना शेअर बाजर देखील स्थिरावताना दिसत आहे. गेल्या सत्रातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. एमसीएक्सवर वायदा बाजारातील सोन्याचा दर 0.12 टक्यांनी घसरून 48619 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 70722 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला आहे. सोन्याचा दर दोन दिवसांत एक हजार रुपयांनी घसरला आहे.
तर चांदीचा दर दोन हजार रुपयांनी घसरला आहे. गेल्या व्यापार सत्रात, सोन्याचा दर दोन टक्क्यांनी कमी झाला होता. तर चांदीचा दर 2.5 टक्के प्रति किलो ग्रॅमने कमी झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे दोन आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे. स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे. गेल्या व्यापार सत्रात यात दोन टक्क्यांची घसरण झाली होती. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 27.31 डॉलर प्रति औंसवर आली होते.

