Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर

Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर

Published by :
Published on

काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,६३० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

आजचा भाव काय?

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,९४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३१ रुपये आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com