google search
google search

Google Annual Search Report: कोणती पर्यटन स्थळं, खाद्यपदार्थांमध्ये काय सर्च केलं गेलं?

गुगलच्या वार्षिक सर्च अहवालानुसार, भारतीयांनी 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेले टॉप ट्रेंडिंग विषय कोणते होते हे जाणून घ्या. स्पोर्ट्स इवेंट्स, राजकीय घडामोडी आणि मनोरंजन क्षेत्रातील टॉप सर्चेसची माहिती पाहुया.
Published by :
Team Lokshahi
Published on

यंदाचा Annual Search Report गुगलने जाहीर केला आहे. या रिपोर्टमुळे आपल्या भारतीयांनी या वर्षामध्ये सर्वात जास्त गुगलवर काय सर्च केलं त्याची माहिती आपल्याला कळते. यावर्षी भारतीयांनी सर्वात जास्त सर्च केलेले मीम्स कोणते होते ते आपण पाहणार आहोत.

कोणती पर्यटन स्थळं सर्च केली गेली?

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांमध्ये अझरबाईजान आणि बाली विषयी माहिती सर्च केली गेली. तर देशातंर्गत पर्यटन स्थळांमध्ये नेटिझन्सने मनाली आणि जयपूरला विशेष पसंती दिली.

खाद्यपदार्थांमध्ये काय सर्च केलं गेलं?

मँगो आचार आणि ओणम या सणाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांची रेसिपी सर्च केली गेली. तर पोर्नस्टार मार्टिनीसारखे कॉकटेल सर्चिंग ट्रेंडमध्ये होती.

इतर काही ट्रेंडिंग सर्चेस

पर्यावरणाशी संबंधित सर्चेसमध्ये 'मेरे नज़दिक का AQI' म्हणजेच जवळच्या भागातील हवेचा निर्देशांक यासारखे प्रश्न ट्रेंड होते.

जागतिक स्तरावर 'ऑल आईज ऑन राफ़ा' (All Eyes On Rafa) हे सर्च केलं गेलं.

'पूकी' आणि 'मोये मोये' या शब्दांचा अर्थ लोकांनी शोधला.

ही बातमी ही वाचा-

google search
Google Annual Search Report: गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक काय सर्च केलं?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com