cylinder rules Changes : UPI, PF, LPG Cylinders। UPI, PF, LPG सिलेंडरचे नियम बदलणार; नेमके काय बदल झाले, जाणून घ्या...
UPI, PF, LPG सिलेंडरच्या नियमात आजपासून बदल करण्यात आले आहेत. सरकार EPFO ची नवीन आवृत्ती आणणार आहे. तर PF क्लेम सोपा होणार आहे. सरकार EPFO ची नवीन आवृत्ती, EPFO 3.0 लाँच करणार आहे. त्याचसोबत PF क्लेम खूप सोपा होईल, ATM आणि UPI मधून पैसे काढता येणार आहे. असे 8 मोठे नियम बदलणार असून या नियम बदलामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
UPI, PF, LPG च्या नियमांमध्ये 'हे' बदल
सरकार EPFO 3.0 लाँच आवृती लाँच करण्याची शक्यता, यामुळे तुमचा PF क्लेम खूप सोपा होईल. तसेच मोफत आधार अपडेट सुविधा संपली, आधार अपडेटसाठी 50 रूपये निश्चित होतील. कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास 2 टक्के बाउन्स शुल्क असणार आहे. सीएनजी-पीएनजी आणि एटीएफच्या किमतीत बदल होण्याची शक्यता. 19 किलो व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती प्रति सिलिंडर 17 रुपयांपर्यत कमी करण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे आणि आणखी कपात अपेक्षित आहे. सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी लागू केलेला नवीन कट-ऑफ वेळ लागू होणार. UPI पेमेंट करताना, वापरकर्त्याला फक्त बँकिंग नाव दिसेल, QR कोड, संपादित दिसणार नाहीत.