Rajinikanth and Others At The Inauguration of MGR Statue
India
Happy Birthday Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस
सुपरस्टार रजनीकांत आज यांचा वाढदिवस आहे. या निमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू येथे झाला.
शिवाजी राव गायकवाड (रजनीकांत) हे त्यांचे वडील रामोजी राव यांच्या चार मुलांपैकी सर्वात लहान होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने रजनीकांत यांना कुली म्हणून काम करावे लागले. तर, मोठे झाल्यावर ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले. आज त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार म्हटले जाते. 'अपूर्व रागांगल' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. 1983 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.