Harshvardhan Patil: अजित पवार मोठे नेते, अजित पवारांनी केलेल्या टीकेवर हर्षवर्धन पाटलांचे प्रत्युत्तर म्हणाले...

Harshvardhan Patil: अजित पवार मोठे नेते, अजित पवारांनी केलेल्या टीकेवर हर्षवर्धन पाटलांचे प्रत्युत्तर म्हणाले...

अजित पवारांनी केलेल्या दलबदलू या टीकेवर हर्षवर्धन पाटलांचे सडेतोड प्रत्युत्तर म्हणाले, मला असं वाटतं की,
Published by :
Team Lokshahi
Published on

अजित पवारांनी केलेल्या दलबदलू या टीकेवर हर्षवर्धन पाटलांचे सडेतोड प्रत्युत्तर म्हणाले, मला असं वाटतं की, अजित दादा हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत आणि त्यांना एक फार मोठा अधिकार प्राप्त झाला आहे तो म्हणजे कुठे ही जायच, कोणत्या ही मतदार संघात जायच, कोणी ही भेटायला आलं तर कोणाबद्दल काहीही बोलण्याचा आणि कसही बोलण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे ते आता आम्हाला सगळ्यांना अंगोळणी पडलेले आहेत.

आता माझ्या इथ काय बोलले त्यापेक्षा तिथे अजगावला काय बोलले हे सगळ्यांना माहित आहे. आपल्याकडे संस्कृती आहे एखाद्या दिवंगत झालेल्या माणसाबरोबर आपण बोलत नाही आणि 10 वर्षांपुर्वी जो माणूस दिवंगत झाला आहे. त्याच्याबद्दल काय वक्तव्य केलं आहे, की त्यांनी आमचा केसांनी गळा कापला आणि 70 हजार कोटींच्या पैशांची जी फैल आली होती.

त्याच्यावर आर आर पाटलांनी सही केली होती. आता यात आर आर पाटलांचा काही दोष होता का? आणि माझ्या मतदार संघात येऊन त्यांनी हे जे कीह वक्तव्य केलं आहे. आमच्याबद्दल जे शब्द काढले खर तर मी त्यांचे आभारचं व्यक्त करतो. आता ते एकदा आले मला अस वाटत त्यांनी अजून 150 गावात याव.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com