यंदा असं करा हरतालिका तृतीयेचंं व्रत आणि पूजा!
श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हरितालिकेच्या व्रतात शिव-पार्वतीचे पूजन केले जाते. कुमारिका आणि महिला या दिवशी व्रत करतात.
हरतालिका पुजा मुहुर्त आणि तिथी : योग्य मुहूर्त सकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे तर प्रदोष काल हरितालिका व्रत पूजा मुहूर्त हा सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटापासून ते रात्री 8 वाजून 51 मिनटांपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचे (पिंडीचं) विसर्जन करून महिला हा व्रत पूर्ण करतील
हरितालिका पूजाविधी :
▪️ या दिवशी अंगाला तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छा जागी चौरंग ठेवुन भोवती रांगोळी काढावी.
▪️ चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे.
▪️ उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा.
▪️ समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
▪️ सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.
▪️ अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.
▪️ सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
▪️ पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.