Health Tips : तुम्हालासुद्धा झोप लागत नाही? मग आवर्जून करा 'या' पदार्थांचे सेवन

Health Tips : तुम्हालासुद्धा झोप लागत नाही? मग आवर्जून करा 'या' पदार्थांचे सेवन

गाढ झोपेसाठी आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत? प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स आणि आंबवलेले अन्न सेवन करून झोपेच्या समस्यांवर मात करा. अधिक जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

निरोगी आरोग्यासाठी सात- आठ तासांची गाढ झोप आवश्यक असते. मात्र, हल्ली रात्री झोप न येणे व कूस बदलत राहणे ही समस्या अनेकांना भेडसावत असते. सध्याच्या या धावपळीच्या आणि तणावपुर्ण जीवनात झोप जणू काही गायबच झाली आहे. तज्ज्ञांनी झोप न येण्यासाठी काही कारणे व त्यावरील उपाय सांगितलेले आहेत, जाणून घ्या त्याबद्दल अधिक माहिती

प्रोबायोटिक्स -प्रोबायोटिक्स हे जिवंत सूक्ष्मजीव आहेत. जे आपल्या आतड्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते . जे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. प्रोबायोटिक्स जे शरीरातील आरोग्याविषयक समस्या कमी होण्यास मदत होते.

प्रीबायोटिक्स -प्रीबायोटिक्स हे आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूच्या वाढीस मदत करतात, जे पचनास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

आंबवलेले अन्न- आंबवलेले अन्न प्राचीन प्रक्रियेचा वापर करुन जतन केले जाते. ज्यामुळे अन्नाची शेल्फ लाइफ, पौष्टिक मूल्य वाढते आणि पोटात निरोगी प्रोबायोटिक्स वाढतात. उदा. इडली, दही, डोसा इत्यादी आंबलेल्या पदार्थांचा यादीत समावेश आहे.

पोस्टबायोटिक्स- पोस्टबायोटिक्स हे आतड्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.

सिनबायोटिक्स- सिनबायोटिक्स हे प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स यांचे मिश्रण आहे. जे झोपच्या समस्या निर्माण करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. सिनबायोटिक्स हे झोपेमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर ठेवते. अशा समस्या टाळण्यासाठी दही, चीज, आंबलेल्या पदार्थ उपयुक्त असते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com