तुम्हीही चपातीला तूप लावून खाता? तर ही बातमी नक्की वाचा

तुम्हीही चपातीला तूप लावून खाता? तर ही बातमी नक्की वाचा

चपातीवर तूप टाकून खायचे का? होय, तर त्याचे फायदे काय आहेत. नसेल तर रोटीवर तूप लावल्याने काय दुष्परिणाम होतात? हे जाणून घ्या.

Ghee Chapati : आपल्या देशात तूप लावून चपाती खाण्याची परंपरा आहे. आजही अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला फक्त तूप लावून चपाती दिली जाते. चपाती आणि तुपाची चव आणि सुगंध मनाला आनंद देतो. बरेच लोक त्याशिवाय अन्न खातही नाहीत. पण, चपातीवर तूप टाकून खायचे का? होय, तर त्याचे फायदे काय आहेत. नसेल तर रोटीवर तूप लावल्याने काय दुष्परिणाम होतात? हे जाणून घ्या.

तुम्हीही चपातीला तूप लावून खाता? तर ही बातमी नक्की वाचा
दररोज करा त्रिफळाचे सेवन; होतील 'हे' 7 आश्चर्यकारक फायदे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चापतीवर थोडेसे तूप लावल्यास ते हानिकारक होण्याऐवजी फायदेशीर ठरते. परंतु, जास्त प्रमाणात तूप लावणे टाळावे, कारण ते हानिकारक देखील असू शकते. तूप काही लोकांसाठी फायदेशीर आणि काहींसाठी हानिकारक असू शकते. म्हणूनच तूप कोणासाठी हानिकारक आहे आणि कोणासाठी फायदेशीर आहे हेही जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

तूप कोणासाठी फायदेशीर आहे?

आरोग्य तज्ञांच्या मते, प्रत्येक मानवी शरीराची स्वतःची क्षमता असते. तूप कुणाला फायदेशीर आणि कोणाला हानी पोहोचवू शकतं, त्या व्यक्तीचं आरोग्यावर अवलंबून असते. जर एखाद्याचे आरोग्य आधीच कमजोर असेल तर त्याला तुपाचा फायदा मिळत नाही. त्याचबरोबर तूप कमी प्रमाणात खाल्ल्यास कोणतेही नुकसान होत नाही. चपतीवर थोडेसे तूप लावले तर कोणतेही नुकसान होत नाही.

चपातीमधील तूप वजन कमी करते का?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तूप उपयुक्त आहे, अॅलोपॅथीमध्ये त्याचा उल्लेख नाही. परंतु, काही जणांचा विश्वास आहेत की वजन कमी करण्यासाठी तूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी तूप लावून चपाती खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते. कारण चपातीवर तूप लावल्यानंतर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि निरोगी कोलेस्टेरॉल देखील वाढू शकतो.

चपातीवर तूप लावल्याने काय नुकसान होते?

डॉक्टरांच्या मते, जास्त प्रमाणात तूप खाणे हानिकारक ठरू शकते. तुपाच्या सेवनाने हृदयरोग्यांना नुकसान होते किंवा कोलेस्ट्रॉल वाढते. तूप जास्त काळ जास्त तापमानात ठेवल्याने त्याची संरचना बदलते आणि शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होऊ लागतात. मुक्त रॅडिकल्सची निर्मिती म्हणजे अनेक रोगांची सुरुवात. त्यामुळे एक किंवा दोन चमच्यांपेक्षा जास्त तूप कधीही खाऊ नये.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com