Benefits of drinking Warm water :  रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे

Benefits of drinking Warm water : रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे

पाणी हे आपल्या जीवनातला महत्वाचा घटक आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी म्हणजे दिवसातून साधारण आठ ग्लास तरी पाणी पिणे आवश्यक असते.
Published by  :
shweta walge

पाणी हे आपल्या जीवनातला महत्वाचा घटक आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी म्हणजे दिवसातून साधारण आठ ग्लास तरी पाणी पिणे आवश्यक असते. भरपूर पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील अपायकारक घटक लघवीवाटे व घामावाटे बाहेर पडतात, शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते, दिवसभर ताजेतवाने वाटते आणि याबरोबरच जर तुम्हाला गरम पाणी पिण्याची सवय असल्यास उत्तमचं!! कारण थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे आरोग्यासाठी फायदे अधिक आहेत.

गरम पाणी पिण्याचे फायदे – Benefits of drinking Warm water :

रक्ताभिसरण व्यवस्थित होते

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते, शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते

दिवसातून वरचेवर गरम पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यांना पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांनी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ग्लासभर गरम पाणी प्यावे.

पित्त व गॅसेसवर उपयुक्त

गरम पाणी पिल्याने पोटातील गॅसेस कमी होतात, अॅसिडीटीचा त्रास, डोकेदुखी व पित्ताच्या तक्रारी कमी होतात.

वजन कमी करते

गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर

गरम पाणी पिल्यामुळे त्वचेचे आरोग्यसुद्धा चांगले राहून, त्वचेवर पिंपल्स येणे कमी होते तसेच केसांच्यावाढीसाठीही गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.

स्त्रियांसाठी उपयुक्त

मासिक पाळीच्यावेळी स्त्रीयांना होणाऱ्या पोटदुखीवर कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. तसेच पाळीच्या दिवसात सतावणारी डोकेदुखीही यामुळे कमी होते.

Benefits of drinking Warm water :  रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे
Face glow tips: चेहरा गोरा करण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी हे करा घरगुती उपाय

हळद आणि गरम पाणी पिण्याचे फायदे

दररोज सकाळी हळद घालून गरम पाणी पिणेही लाभदायक असते. यामुळेही पचनशक्ती चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, शरीरातील सूज कमी होते, सांधेदुखीचा त्रास कमी होतो, रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी व इतरांनीही दररोज सकाळी हळद आणि गरम पाणी पिणे लाभदायी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com