गाय की म्हैस? कोणाचे दूध आहे आरोग्यदायी; जाणून घ्या

गाय की म्हैस? कोणाचे दूध आहे आरोग्यदायी; जाणून घ्या

दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दूधाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. आपल्याला सतत निरोगी ठेवण्याचे कामही दूध करते. आपल्या जीवनात दुधाचे अनन्यसाधारण महत्व आहे. दुधात अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात तसेच प्रोटीनची मात्राही असते.

मात्र अनेकदा सर्वांना हा प्रश्न पडतो की, गायीचे की म्हशीचे? कोणाचे दूध जास्त फायदेशीर आहे. म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्या तुलनेत गायीच्या दुधात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. वजन वाढवण्यासाठी म्हशीचे दूध अधिक फायदेशीर असते. तर उच्च रक्तदाब किंवा पोटाचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी म्हशीचे दूध पिणे फायद्याचे असते.

म्हशीच्या दुधाच्या तुलनेत गायीच्या दुधात अधिक प्रमाणात पाणी असते. म्हणून गायीचे दूध पातळ असते. गायीचे दूध लवकर पचते. गायीच्या दुधापासून बनवण्यात आलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. गायीचे दूधच आरोग्यसाठी आणि निरोगी राहण्यासाठी उत्तम असते. म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थामुळे वजन वाढते. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेत कॅलरीजची मात्रा अधिक प्रमाणात असते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com