दही-भात खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

दही-भात खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

दही खाण्यास खूपच चविष्ट असते.
Published by  :
Siddhi Naringrekar

दही खाण्यास खूपच चविष्ट असते. दह्यामध्ये पोषक तत्वे असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. भात देखील आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवीत असतो. वणानंतर दह्याचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून दूर राहता येऊ शकते. दही आणि भात एकत्रितरीत्या सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.

पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते आणि ते पचण्यास देखील चांगले आहे.दही आणि भातामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं. यामध्ये कॅलरीजही खूप कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या नियमित डायटमध्ये समावेश करू शकता.

दह्यामध्ये प्रोबॉयोटिक्स अँटिऑक्सीडेंट आणि आवश्यक फॅट्स उपलब्ध असतात. यामुळे मेंदूत तणाव आणि वेदना निर्माण करणाऱ्या भावनांचा सामना करण्यासाठी मदत मिळते. दहीभात आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास उपयोगी ठरते. ताप आल्यावर जेवण जात नाही तसेच अन्न कडू लागते, त्यामुळे अशा वेळी दही भाताचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात.दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com