डासांचा नायनाट करण्यासाठी घरात मच्छर कॉइलचा वापर करता? ही मच्छर कॉइल तुमच्या ही जिवासाठी ठरू शकते घातक; जाणून घ्या...
पावाळ्या सुरु होताच घरात डास, माशी, लहान किटक आणि असे अनेक किटक घरात वावरू लागतात. काही वेळा माशी आणि इतर किटकांपासून आपल्याला सुटका मिळते पण डासांपासून सुटका मिळवण अनेक लोकांसाठी कठीण जात. अशा वेळेस अनेक जण आपल्या घरात मच्छर कॉइलचा वापर करतात. मच्छर कॉइल पेटवल्या बरोबर त्यातून येणारा धूर हा डास पळवून लावण्यास मदत करतो. त्यामुळे घरातील डास नाहीसे होतात. पण हीच मच्छर कॉइल डासांसकट मानवी आरोग्यासाठी देखील घातक ठरू शकते.
डासांसकट ती एखाद्या माणसाच्या देखील जिवावर बेतू शकते. मच्छर कॉइलमध्ये ॲल्युमिनियम, क्रोमियम, पायरेथ्रिन किंवा सुगंधी पदार्थ, सिट्रोनेला आणि कथील यांसारख्या गुणधर्मांचा समावेश असतो. ज्यावेळेस कॉइल जळवले जाते त्यावेळेस त्यातून फॉर्मलडिहाइट, पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन यांसारखे हानिकारक रसायने वाफेद्वारे बाहेर पडतात, जे डासांना दूर ठेवण्यासाठी मदत करतात. पण यासगळ्या गुणधर्मांमुळे मच्छर कॉइलमधून प्रदूषक निर्माण होते ज्यामुळे आजार होऊ शकतात.
याचा मुख्य धोका हा मुलांवर होऊ शकतो लहान मुलांवर मच्छर कॉइल घातक परिणाम करू शकते. कॉइलमध्ये अशी रसायने असतात जी श्वास घेण्यास सुरक्षित नसतात आणि घरातील वायू प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतात किंवा वाढवू शकतात. त्यामुळे दमा आणि अस्थमा श्वासोच्छवासाचा त्रास आणि खोकला देखील होऊ शकतो. अति धूरामुळे दमा, अस्थमा आणि खोकल्यामुळे श्वास गुदमरू शकतो आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
तसेच डोळ्यांना ऍलर्जी होऊन डोळ्यांना त्रास देऊ शकतात. तसेच सतत शिंका येणे, मळमळ आणि चक्कर येणे त्याचसोबत त्वचेवर पुरण येणे अशा ऍलर्जी देखील होऊ शकतात. याचा सर्वात मोठा धोका म्हणजे यामुळे कर्करोग होण्याच्या शक्यता असतात. याच्यामध्ये फॉर्मलडिहाइट, पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि बेंझिन यांसारख्या रसायनांचा समावेश असल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता आढळू शकते.