किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी खा ‘ही’ फळे

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी खा ‘ही’ फळे

किडनीचे आरोग्य चांगलं असेल तर आपलं शरीरही निरोगी राहतं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

किडनीचे आरोग्य चांगलं असेल तर आपलं शरीरही निरोगी राहतं. किडनी निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. शरीरातील टाकाऊ घटक आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनी करते. किडनीची पूर्ण काळजी घेणे गरजेचे असते.

टरबूज हे हायड्रेटिंग फळ असून त्यात भरपूर पाणी असते. हे खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. त्याचबरोबर कलिंगड हे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उत्तम फळ आहे.

अननस खाल्ल्याने जे दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असते. यामुळे मूत्रपिंडाची जळजळ कमी होण्यास मदत होते.

सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. सफरचंदात पेक्टिन नावाचे कंपाऊंड असते, जे ते खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकतात.

ब्लूबेरी मूत्रपिंडाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. ब्लूबेरी युरिनरी ट्रॅक आरोग्य सुधारण्यास मदत करते.

किडनी स्टोन रोखण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. शरीर चांगले डिटॉक्सिफाई होते. लिंबू आरोग्यासाठी चांगले आहे.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com