स्नेकबाईटची नशा कशी असते? जाणून घ्या शरीरावर काय होतात परिणाम?

स्नेकबाईटची नशा कशी असते? जाणून घ्या शरीरावर काय होतात परिणाम?

एल्विश यादववर पार्ट्या आणि क्लबमध्ये स्नेकबाईट पुरविल्याचा आरोप आहे. आता प्रश्न पडतो की नशा करण्यासाठी लोक सापाचा कसा उपयोग करतात?
Published on

Snake Byte : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बिग बॉस विजेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या एल्विश यादवच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पार्ट्या आणि क्लबमध्ये स्नेकबाईट पुरविल्याचा आरोप आहे. आता प्रश्न पडतो की नशा करण्यासाठी लोक सापाचा कसा उपयोग करतात? स्नेक बाईटनंतर शरीरात कोणते बदल होतात आणि ही नशा किती काळ टिकते?

स्नेकबाईटची नशा कशी असते? जाणून घ्या शरीरावर काय होतात परिणाम?
खरे आणि नकली बदाम ओळखण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

कशी असते ही नशा?

संशोधकांनी अलीकडेच स्नेकबाईट नशा करणाऱ्या लोकांवर अभ्यास केला. यामध्ये त्यांनी दोन मुलांवर लक्ष ठेवून स्नेकबाईटचा नशा करणाऱ्या या मुलांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे पाहिले. बातम्यांनुसार, जेव्हा कोणी स्नेकबाईट नशा करतो तेव्हा त्याला साप चावल्यानंतर हळूहळू डोळ्यासमोरील अस्पष्ट येते. याचे सेवन करणारे लोक सांगतात की, सर्पदंश केल्यावर तासभर शरीर सुन्न होते. परंतु, अनेक वेळा या व्यसनामुळे लोकांचा मृत्यूही होतो.

त्याचा परिणाम शरीरावर किती काळ टिकतो?

इंटरनेटवर यासंबंधी माहिती शोधली असता अनेक ठिकाणी असे लिहिलेले आढळले की ही नशा केल्यानंतर शरीरावर हँगओव्हर किमान पाच दिवस टिकतो. त्याची नशा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खूप मजबूत असते. हे औषध अत्यंत धोकादायक आहे, म्हणूनच भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हे बेकायदेशीर आहे. या औषधाचे सेवन करताना कोणी पकडले गेले तर त्याला शिक्षा होऊ शकते. एल्विश यादववरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला शिक्षाही होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com