दुखापतीमुळे त्वचा निळं का होतो? जाणून घ्या उपचार कसे करावे?
Bruise first aid: मुकामार लागल्यानंतर त्याठिकाणी निळं पडलेले दिसते. हे सहसा ऊतींना झालेल्या दुखापतीमुळे होते. दुखापतीमुळे त्वचेखालील रक्तवाहिन्या दबतात त्यामुळे तेथे रक्त थांबते. यामुळे त्वचेवर निळं डाग दिसतात. मात्र, जसजसे ते बरे होतात, त्यांचा रंग नाहीसा होतो. निळे पडल्यास प्रथमोपचारात काय करावे आणि काही सामान्य उपायांचा अवलंब करून त्यावर उपचार करता येतील ते जाणून घेऊया.
उपचारांसाठी काय करावे?
- सर्वप्रथम बर्फाचा तुकडा एका पातळ टॉवेलमध्ये गुंडाळा आणि वीस मिनिटे निळं झालेल्या भागावर ठेवा. दिवसातून अनेक वेळा याची पुनरावृत्ती करा. यामुळे वेदना आणि सूज कमी होईल.
- जखमेच्या ठिकाणी सूज दिसल्यास तेथे इलास्टिक बॅन्डेज लावावे. ते जास्त घट्ट नसावे हे लक्षात ठेवा.
- जर जखम झालेल्या भागावर त्वचा फाटलेली नसेल तर पट्टी बांधण्याची गरज नाही. गरज भासल्यास पेन किलर घेऊ शकता.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
- जखमेच्या ठिकाणी तीव्र वेदना
- किरकोळ दुखापत झाली असूनही तीन दिवसांनंतरही वेदना जाणवत राहणे
- वारंवार आणि मोठ्या जखमा
- कोणत्याही कारणाशिवाय किंवा दुखापतीशिवाय अचानक काळनिळं पडणे
- कौटुंबिक इतिहास
- निळं झालेल्या जागेखाली गुठळ्या येतात, हे रक्त जमा झाल्यामुळे होऊ शकते. या स्थितीला हेमेटोमा म्हणतात.
- नाकातून किंवा हिरड्यांमधून असामान्य रक्तस्त्राव.