Packaging Food Color Symbol : अन्नपदार्थांच्या पॅकेटवरील रंगांचे अर्थ

Packaging Food Color Symbol : अन्नपदार्थांच्या पॅकेटवरील रंगांचे अर्थ

अन्नपदार्थांच्या पॅकेटवरील रंगांचे अर्थ: शाकाहारी, मांसाहारी आणि औषधी उत्पादनांचे संकेत
Published by :
Shamal Sawant

पॅकेजिंग फूडवर काही कलरचे सिम्बॉल आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आपल्याला केवळ रेड आणि ग्रीन सिम्बॉलचा अर्थ माहित असतो. रेड म्हणजे मांसाहारी पदार्थ अश्या पदार्थांच्या पॅकेटवर रेड सिम्बॉल असतो. तर जे पदार्थ शाकाहारी असतात त्या पदार्थांच्या पॅकेटवर ग्रीन सिम्बॉल असतो. मात्र याव्यतिरिक्त अजून तीन रंगाचे सिम्बॉल पॅकेजिंग फूडवर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्याचा अर्थ काय ? लाल हा मांसाहारासाठी तर हिरवा हा रंग शाकाहारी पदार्थासाठी असतो. पण कधी कधी इतरही रंग त्यामध्ये असतात याची माहिती आपण जाणून घेऊया.

1. निळा रंग

निळा रंग हा औषधी उत्पादनांनमधे वापरला जातो. याचाच अर्थ ते वैद्यकीय क्षेत्रांत वापरण्यात येणारे उत्पादन असून त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्यानेच केला पाहिजे.

2. पिवळा रंग

पॅकेज फूडवर असते कारण की,उत्पादनात अंडी आहे. बरेच लोक अंडी खात नाहीत, अशा लोकांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर या पॅकेज फूडमध्ये विशिष्ट पोषक तत्वाचे प्रमाण मध्यम आहे.

3. काळा रंग

जर अन्नाच्या पॅकेटवर काळे डाग असेल तर ते सूचित करते की त्या उत्पादनात बरीच रसायने आहेत. ते उत्पादनाची चव वाढावी यासाठी वापरले जाते. मात्र असे पॅकेजिंग फूड आरोग्यास हानिकारक ठरू शकते. या उत्पादनांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृतावर आणि मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो

कलर कोड्सचा मुख्य उद्देश ग्राहकांना अन्नपदार्थांमधील पोषक तत्वांचे प्रमाण सहजपणे समजून घेण्यास मदत करणे आहे. यामुळे लोकांना त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास आणि निरोगी जीवनशैली जगण्यास मदत होते. कलर कोड्स वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या उत्पादनांसाठी थोडेफार वेगळे असू शकतात.अन्नपदार्थांच्या पॅकिंगवर अधिक माहितीसाठी लेबल काळजीपूर्वक वाचावे.तसेच पुढच्यावेळी पॅकेजिंग फूड विकत घेताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com