बाप्पाचे आवडते मोदक खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' फायदे; जाणून घ्या

बाप्पाचे आवडते मोदक खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' फायदे; जाणून घ्या

मोदक फक्त खाण्यातच स्वादिष्ट नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. आज आपण मोदक खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Ganesh Chaturthi 2023 : देशभरात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेश पूजेची सर्वात खास गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला मोदक अर्पण केले जातात. श्रीगणेशाला मोदक खूप आवडतात असा उल्लेख शास्त्रातही आहे. पण, मोदक फक्त खाण्यातच स्वादिष्ट नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. आज आपण मोदक खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

या गोष्टींपासून मोदक तयार केले जातात

तांदळाचे पीठ, तूप, नारळ, गूळ आणि सुका मेवा यांपासून मोदक तयार केले जातात. डॉक्टरांपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत मोदक खाण्याचे अनेक फायदे असल्याचे मानतात. मोदकाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्या लोकांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे ते आपल्या डाएट प्लॅनमध्ये याचा समावेश करू शकतात.

हे आहेत मोदक खाल्ल्याने मिळणारे फायदे

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

मोदक भरपूर तूप घालून बनवले जातात. आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी हे खूप चांगले आहे. त्याचबरोबर शरीरातील घाण काढण्याचेही काम करते. तुपामुळे आतडेही निरोगी राहतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि पचनक्रिया चांगली राहते.

रक्तदाब कमी होतो

मोदकात नारळाचा वापर केला जातो. नारळात ट्रायग्लिसराइड्स असतात. ट्रायग्लिसराइड्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

मोदकामध्ये नारळ आणि सुका मेवा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करते. हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचेही काम करते.

वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त

मोदक बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. मोदकाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जर तुम्हाला मिठाईची हौस असेल तर तुम्ही मोदक खाऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com