Black Pepper Oil: काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे!

Black Pepper Oil: काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे!

या तेलात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊया या तेलाच्या मदतीने तुम्ही कोणत्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
Published by :
Team Lokshahi

काळी मिरी हा एक प्रकारचा मसाला आहे, तो भारतातील जवळपास प्रत्येक स्वयंपाक घरात आढळतो. आणि काळी मिरीच्या वापरामुळे जेवणाची चव वाढते. पण तुम्ही कधी काळी मिरी चे तेल ऐकले आहे का?

या तेलात विटामिंस, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. आजच्या आर्टिकल मध्ये या तेलाच्या मदतीने तुम्ही कोणत्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता ते जाणून घेऊया.!

काळी मिरी तेलाचे फायदे

1. त्वचेशी संबंधित समस्या त्वचारोगासाठी काळी मिरी तेलदेखील खूप प्रभावी मानले जाते. त्वचारोगामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात. काळी मिरी तेल रंगद्रव्य उत्पादनास उत्तेजन देते.

2. काळ्या मिरीपासून तयार केलेले तेल पोटासाठी आणि पचनशक्तीसाठी चांगले असते. हे पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिडचे स्राव सुधारते. या तेलामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते, त्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठता होत नाही.

3. जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर काळी मिरीपासून तयार केलेले आवश्यक तेल तुम्हाला आराम देऊ शकते. हे तेल कोंडलेले नाक उघडण्याचा एक चांगला मार्ग आहे. श्वसन प्रणालीमध्ये उपस्थित कफ आणि श्लेष्मा कमी करण्यासाठीदेखील हे प्रभावी आहे.

4. काळी मिरी तेल संधिवात सारख्या समस्यांना देखील प्रतिबंधित करते. हे रक्ताभिसरण सुधारते आणि संधिवातापासून आराम देते. तसेच शरीरातून युरिक ऍसिड सारखे विषारी पदार्थ बाहेर टाकतात.

5. या तेलामध्ये कार्मिनेटिव्ह नावाचे घटक असतात, जे पोट आणि आतड्यांमध्ये तयार होणारा वायू कमी करण्यास मदत करतात. तसेच अतिरिक्त वायू तयार होऊ देत नाहीत. ते वायू निर्माण करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते.

6. काळ्या मिरीच्या बाहेरील थरामध्ये एक संयुग असते जे चरबीच्या पेशींचे विघटन करण्यास चालना देते, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या चरबी लवकर कमी होऊ शकते.

7. काळ्या मिरीच्या इसेन्शियल ऑइलमध्ये एक विशिष्ट सुगंध असतो, ज्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. मेंदूचा इन्सुला ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भागदेखील काळी मिरी तेलाच्या सेवनाने सक्रिय होऊ शकतो. हे आपल्या गिळण्याच्या गतीस मदत करते. ज्यांना स्ट्रोक आला आहे किंवा गिळण्यास त्रास होत आहे अशा लोकांसाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com