तुम्हीही जेवल्यानंतर लगेच पाणी पिता तर थांबा! आधी 'हे' वाचाच

तुम्हीही जेवल्यानंतर लगेच पाणी पिता तर थांबा! आधी 'हे' वाचाच

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Water After Food Disadvantages : अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. बहुतेक लोक जेवताना पाणी प्यायला पितात किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पितात. डॉक्टर ते टाळण्याचा सल्ला देतात.

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. असे केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यावे टाळावे. चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे काय आहेत तोटे?

लठ्ठपणा वाढू शकतो.

पचनाच्या समस्या असू शकतात.

पोटात गॅस सारख्या समस्या असू शकतात.

रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

अन्न खाल्ल्यानंतर पाणी कधी प्यावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हाही अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान दोन तास लागतात. दरम्यान, जर तुम्ही पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या पचनावर परिणाम होतो. म्हणूनच अन्न खाल्ल्यानंतर किमान ४५ ते ६० मिनिटांनंतरच पाणी प्यावे. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायचे असेल तर अर्धा तास आधी प्यावे.

जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

1. जेवणानंतर तासाभराने पाणी प्यायल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहते, लठ्ठपणा तुम्हाला कधीही त्रास देणार नाही.

2. जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया चोख राहते. पचनसंस्था मजबूत होते.

3. योग्य वेळी पाणी प्यायल्यास पोटात गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या होणार नाहीत.

4. जेवल्यानंतर जेव्हा पाणी शरीरात उशिरा पोहोचते, तेव्हा शरीर अन्नातील पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषण्यास सक्षम होते.

5. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com