हिवाळ्यात काही वेळ उन्हात बसल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात काही वेळ उन्हात बसल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

आजकाल व्यस्त वेळापत्रकामुळे उन्हात बसायला म्हणजे सनबाथला वेळ मिळत नाही, हे धोकादायक ठरू शकते. कारण हिवाळ्यात उन्हात बसल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्हीही फायदे होतात.
Published on

Sunbathing in Winter : हिवाळ्यातील सूर्यप्रकाश आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. तासनतास उन्हात बसून बोलणे, काम करणे किंवा झोपणे चांगले वाटते. पूर्वी या गोष्टी सर्रास असायच्या पण आजकाल व्यस्त वेळापत्रकामुळे उन्हात बसायला म्हणजे सनबाथला वेळ मिळत नाही, हे धोकादायक ठरू शकते. कारण हिवाळ्यात उन्हात बसल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्हीही फायदे होतात. जाणून घ्या थंडीत उन्हात बसण्याचे काय फायदे आहेत?

हिवाळ्यात काही वेळ उन्हात बसल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
हिवाळ्यात गुडघेदुखी वाढली असेल तर लावा 'हे' स्पेशल तेल; लगेच मिळेल आराम

हिवाळ्यात उन्हात बसण्याचे काय फायदे आहेत?

1. चांगली झोप येते

हिवाळ्यात सनबाथ घेतल्याने चांगली झोप येते. यामुळे मेलाटोनिन नियंत्रित करतो, ज्यामुळे झोप सुधारण्यास मदत होते.

2. हॅप्पी हार्मोनची पातळी वाढते

हिवाळ्यात उन्हात बसल्याने आतून आनंद मिळतो. यामुळे शरीरातील हॅप्पी हार्मोन सेरोटोनिनची पातळी वाढते. हा हार्मोन नैराश्य कमी करून तुम्हाला आनंदी ठेवतो. यामुळे मानसिक समाधान मिळते. हिवाळ्यात सनबाथ घेतल्याने फोकस वाढतो आणि स्मरणशक्ती सुधारते.

3. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढली जाते

व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या सुरू होतात. व्हिटॅमिन डी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि हाडे मजबूत करते. हे शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्याचे काम करते. हिवाळ्यात सूर्यस्नान केल्याने मधुमेह, हृदयविकार आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन डीमुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोकाही कमी होतो.

4. ऊर्जा वाढवा

हिवाळ्यात आळस वाढतो. अशा स्थितीत उन्हात बसल्याने शरीराला ऊर्जा मिळते. सूर्यप्रकाश सेरोटोनिनला उत्तेजित करतो. यामुळे मेंदूच्या पेशींपर्यंत संदेश योग्य प्रकारे पोहोचू शकतो. सनबाथ घेतल्याने तणाव, झोपेची समस्या, फोबिया, स्किझोफ्रेनिया यांसारख्या समस्या कमी होतात.

5. प्रतिकारशक्ती मजबूत होते

मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. हिवाळ्यातील सूर्यप्रकाश रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतो. सूर्यप्रकाशामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढते. यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com