गेल्या काही वर्षांमध्ये आजारांच्या वाढत्या संख्येमुळे आपल्या शरीराला प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्सची कमी जाणवत आहे. बदलती जीवनशैली आणि योग्य आणि पोषक आहाराचा अभाव त्यात जंक फुडची वाढती क्रेझ यामुळे आपल्या शरीरात प्रोटिन्सची खूप जास्त कमतरता जाणवते. शाळा कॉलेजच्या अभ्यासात किंवा आरोग्यविषयक माहितीमध्ये अनेकदा आपण प्रथिनं म्हणजे प्रोटिन्स या शब्दाबद्दल ऐकलं असेल मात्र प्रोटिन्स म्हणजे नक्की काय? त्याची आपल्या शरीराला किती आवश्यकता असते? आणि कोणत्या आहाराचा समावेश आपल्या शरीरातील प्रोटिन्सची कमी भरून काढू शकतो? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या शरीराच्या क्रियापचयक्रियांमध्ये प्रोटिन्स महत्वाची भूमिका बजावतात. एक प्रकारे आपल्या शरीराला ताकद देण्याचे काम हे प्रोटिन्स करत असतात. हाडे, केस,नख,त्वचा यांच्या वाढीसाठी हे महत्वाची भुमिका बजावतात. प्रथिने अर्थात प्रोटिन्स काही संप्रेरकांची ही निर्मिती करत असतात.
आपण रोज जो सकस संतुलित आहार घेतो. त्यामध्ये प्रोटिन्सची मात्र मोठ्या प्रमाणावर असते. व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही पदार्थामधुन आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स मिळतात.त्याचप्रमाणे सोया , द्विदल धान्य, डाळी, कठीण कवचाची फळे, यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात.
आजकाल व्यायाम शाळेतील ट्रेनर बऱ्याच वेळा प्रोटिन्स सप्लिमेंट घेण्यासाठी लोकांना उद्युक्त करत असतात. पण खरं पाहता काही गंभीर आजारपणामध्ये , कुपोषित लोकांमध्ये, किव्हा भाजण्यासारख्या घटना घडलेल्या लोकांमध्ये त्यांची शारीरिक झीज भरून काढण्यासाठी या अतिरिक्त प्रथिनांची प्रोटिन्स सप्लिमेंटची गरज असते.
असंतुलित आहार त्यात जर प्रोटिन्स जास्त प्रमाणात घेतले गेले तर वजन वाढणे , डिहायड्रेशन, गॅस ची समस्या, पोटात दुखणे किंवा प्रसंगी मोठे आजार ही उद्भवू शकतात. जास्त काळ प्रोटीनचे सेवन केले असता मूत्रपिंडाचे आजार ही होतात.