उन्हाळ्यात घामामुळं सुटणारी खाज घालवण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय
Home Remedies For Itching : उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि आर्द्रतेमुळे घामाची समस्या वाढते आणि हा घाम सुकल्यानंतर खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर संसर्गाचा धोका वाढतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात अशा प्रकारचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
घामामुळे होणाऱ्या खाज सुटण्यापासून कसे मुक्त व्हावे?
1. बटाट्याच्या वापरानेही खाज दुर होऊ शकते. बटाट्याचे तुकडे करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. आता ते खाज सुटणाऱ्या भागावर ठेवा, थोड्या वेळाने हा भाग पाण्याने स्वच्छ करा. असे केल्याने उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या खाजेपासून सुटका मिळेल.
2. मुलतानी माती उन्हाळ्यात वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो यामुळे खाज येण्याची समस्या आपोआप दूर होते. घामामुळे होणारी खाज दूर करण्यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्या भागावर 10 मिनिटे लावून ठेवा. त्वचा मुलायम होण्यासोबतच खाज येण्याची समस्याही दूर होईल.
3. तुळशीचा वापर करून तुम्ही खाज येण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळवू शकता. यामध्ये असलेले अँटीफंगल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला निरोगी ठेवतात. उन्हाळ्यात घामामुळे होणारी खाज दूर करण्यासाठी तुळशीची पाने धुवून बारीक करून घ्या. याची पेस्ट करुन ती बाधित भागावर १५ मिनिटे लावा. आता स्वच्छ पाण्याने धुवा.
4. खोबरेल तेल लावून खाज येण्यापासून आराम मिळू शकतो. कारण यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेतील बॅक्टेरिया काढून टाकतात. यामुळे कोरड्या त्वचेची समस्याही दूर होते.
5. कोरफड हे थंड करणारे घटक आहे, जे त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. सन बर्न बरे करण्यासोबतच खाज आणि पुरळ उठण्याची समस्याही दूर होऊ शकते.