Monsoon Tips : पावसाळ्यात मसाले आणि धान्यांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या....
पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे. मात्र गृहिणींना ही या अवकाळी पावसामुळे टेन्शन आले आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसात मसाले, साखर, पीठ या गोष्टी लवकर खराब होतात. पावसाळा आला कि वातावरणात थंडावा निर्माण होतो. त्यामुळे आरोग्या बरोबरच इतर ही गोष्टींची शक्य तितकी काळजी घ्यावी लागते. त्यात उन्हाळ्यात बऱ्याच गृहिणी वर्षभराचं वाळवण, मसाले तयार करून ठेवतात. तसेच गहू ज्वारी ,तांदूळ असे धान्य ही भरून ठेवले जातात. मात्र त्याची योग्य निगा न राखल्यास सगळे मसाले, वाळवण खराब होण्याची शक्यता असते. जर योग्य निगा राखली गेली तर वर्षभर वाळवण, मसाले, पीठ जसेच्या तसे टिकतात.
पावसाळी हवेमुळे जर मसाल्यांना जाळे लागत असतील तर त्यासाठी ज्या डब्यात मसाले भरून ठेवणार असाल तो डबा कोरडा करून मगच त्यात मसाले भरावे. शिवाय मसाले भरलेले डब्बे हे हवाबंद पद्धतीचे टाईट कंटेनर असतील तर वर्षभर मसाले खूप चांगल्या पद्धतीने टिकतात. मसाले भरून ठेवताना त्यात जर हिंगाचा खडा टाकून ठेवला किव्हा त्या डब्याच्या तळाशी मीठ पसरवून नंतर त्यात मसाले भरले तर ते चांगले टिकतात. मिठामुळे मसाल्यांमध्ये जाळे होत नाहीत.
त्याचप्रमाणे तांदूळ ज्वारी बाजरी हे भरून ठेवताना ही डब्बे कोरडे करून त्यात तेजपत्ता किव्हा लवंग घालून ठेवले किंवा कडुलिंबाची पाने धान्यमध्ये ठेवली, तर धान्याला कीड लागत नाही आणि वर्षभर धान्य छान टिकते. पावसाळ्यात साखरेला ही ओलावा पकडतो त्यासाठी साखरेच्या डब्यात जर चार पाच लवंग कापडात बांधून ठेवली, तर साखरेला ही ओलावा पकडत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मसाले डब्यांतून काढताना सुख्या कोरड्या चमच्यांचा वापर केला की मसाले खराब होत नाही. सध्या सोप्प्या टिप्स वापरून आपण आपले मसाले धान्य आणि वाळवणाची निगा राखू शकतो आणि त्यामुळे वर्षभर गृहिणीची चिंता ही मिटते.