बाळाला होतोय पोटदुखीचा त्रास? करा ‘हे’ उपाय, मिळेल आराम

बाळाला होतोय पोटदुखीचा त्रास? करा ‘हे’ उपाय, मिळेल आराम

लहान मुलांमध्ये पोट दुखण्याच्या समस्या कोणत्या न कोणत्या कारणांनी उद्भवतात.
Published by  :
Siddhi Naringrekar

लहान मुलांमध्ये पोट दुखण्याच्या समस्या कोणत्या न कोणत्या कारणांनी उद्भवतात. जेव्हा बाळ ६ महिन्यांचं होतं तेव्हा त्याला खायला नवनवीन पदार्थ दिले जातात ज्यामुळे त्याला गॅसची समस्या जाणवू शकते. अशावेळी बाळाला पोटदुखीचा त्रास देखिल होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत. आज तुम्हाला हेच काही घरगुती उपचार आम्ही सांगणार आहोत, जे तुम्ही बाळाच्या पोटात जर तुमच्या मुलाला पोटदुखी होत असेल तर त्याच्या पाठीला मालिश करा. यासाठी फक्त मोहरीचे तेल वापरावे. मुलाला त्याच्या पाठीवर झोपायला लावा आणि त्याला मोहरीच्या तेलाने मालिश करा. बाळाला दुध पाजल्यानंतर त्याने ढेकर देणे गरजेचे आहे. जर बाळ ढेकर नसेल देत तर त्याला काही क्रिया करून ढेकर देण्यास भाग पाडावे. दुध पाजल्यानंतर मुलाला हातात उचलून घ्या आणि त्याचे डोके आपल्या खांद्यावर ठेवून त्याच्या पाठीवर हलके हलके हात फिरवा .

तसेच बाळाच्या पोटात अनेकदा वेदना होतात. मुगली घुटी बाळाला रोज द्यावी. त्यामुळे त्याचे पोट रोज साफ होते. यासोबतच हिंगाचे सेवन केल्याने बाळाच्या पोटदुखीची समस्या कमी होते किंवा दूर होते. बाळाच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचे आहेत. . पोटात गॅस निर्माण झाल्यासही ग्राइप वॉटर खूप गुणकारी ठरते. ग्राइप वॉटर हे बाळाच्या पोटात उष्णता निर्माण करून गॅस काढून टाकते.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com