Radish: मुळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या फायदे...
मुळा हे वनस्पतीचे खाण्यायोग्य मूळ आहे जे लाल, गुलाबी, जांभळा आणि पांढरा अशा अनेक रंगांमध्ये आढळू शकते. तथापि, भारतात आढळणारा सर्वात सामान्य रंग पांढरा आहे. हे अनेकदा कोशिंबीर म्हणून कच्चे खाल्ले जाते. कारण त्याचा तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हिरव्या भाज्यांचेही अनेक फायदे असतात. परंतु हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त आणखी काही भाज्या आहेत ज्यांचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला मुळ्याचे फायदे सांगणार आहोत. मुळा भुजिया, मुळा पराठा किंवा मुळ्याच्या भाज्या खूप चांगल्या असतात. मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.
चला जाणून घेऊया मुळ्याचे फायदे...
1. तुम्ही रोज मुळा (Radish) खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.
2. मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.
3. मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते.
4. तुमच्या घरात जर मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्याच्यासाठी मुळांचं सेवन करणं खूप चांगलं आहे.
5. मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते. परंतु हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी मुळ्याचे सेवन करू नये.
6. शारीरिक थकवा जाणवत असेल तर मुळ्याचा रस प्या. मुळ्याचा रस गरम केल्यानंतर त्यात थोडेसे सेंधा मीठ टाकून गुळण्या करणेही फायदेशीर ठरते.
7. तुमचे दात जर पिवळे पडत असतील तर मुळ्याचे छोटे तुकडे करून त्यावर लिंबाचा रस टाकून दातांना चोळा. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होईल.
8. मुळ्याच्या नियमित सेवनाने किडनी आणि यकृत निरोगी राहते. तसेच ते खाल्ल्याने भूक वाढते.