Kidney Beans: राजमाचे आरोग्यासाठी होणारे फायदे, जाणून घ्या
राजमा म्हणजे काय?
लाल रंगाची थोडी गुलाबी असलेली ही किडनी बीन्स आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. या बियांची भाजी मोठया आवडीने आपल्याकडे खाल्ली जाते व तितकेच आरोग्यासाठी फायदे सुद्धा आहेत. राजमा लाच आपल्या मराठी भाषेत घेवडा असे म्हणतात. याला किडनी बीन्स असे म्हणतात. कारण याचा आकार हा किडनी सारखा आहे.
राजमा हे उष्ण कटिबंध प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आफ्रिका, युरोप आणि अमेरिका येथे याला खूप मोठया प्रमाणात डाळ म्हणून खाल्या जाते. भारतात राजमा हा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि आंध्र प्रदेश मध्ये पिकवला जातो.
या बियांचा आरोग्यासाठी आपल्याला लाभ घ्यायचा असेल, तर यांना रात्र भर भिजून ठेऊन सकाळी तुम्ही हे वापरु शकता. भाजी करण्याआधी यांना दोन चार दा चांगल्या पाण्याने धून घ्या. अस धुतल्याने या मध्ये जे पोट फुगवणारे घटक आहेत, जसे रैफिनोज हे घटक निघून जातात व ह्या बिया खाण्या योग्य होतात.
राजमामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे. जे कोलेस्ट्रॉल आणि शुगर ला कमी करण्यात मदत करते. राजमा हा शुगर पेशन्टनी खाल्ल्यास शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते.
राजमा खूप प्रकारच्या जैव प्रक्रिया जसे मॉलिब्डेनम सारख्या सुष्म तत्व आणि एंजाइमनी भरलेल आहे. हे शरीरातील सल्फाइट्स च्या प्रभावाला कमी करण्यास मदत करते.
राजम्या मध्ये बी1,बी6 आणि फोलेट बी9 या प्रकारचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन आहेत. जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.
वरील व्हिटॅमिन हे रक्तामधील होमोसिस्टीन चे प्रमाण कमी करते. ज्यामुळे हृदया संबंधि रोग कमी होण्यास मदत होते. याच सोबत गाठ संबधी रोगांनं मध्ये राजमा लाभ देतो.
राजमा खाण्याचे दुष्परिणाम
राजमामध्ये फायबर मोठया प्रमाणात असल्यामुळे, तुम्ही जर जास्त प्रमाणात राजमा चे सेवन करत असाल, तर तुमच्या शरीरात फायबर चे प्रमाण वाढून हे तुमच्या पचनशक्ती ला कमजोर करू शकते. ज्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी, डायरिया, पोट दुखणे तसेच पोटाच्या आणखी समस्या जाणवू शकतात.
1 कप राजमा मध्ये 5.2 मिली. ग्राम आयर्न आहे. आपण जास्त प्रमाणात राजमा चे सेवन करत असाल, तर आपल्या त्यामुळे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात आयर्न साठते यामुळे शरीरातील ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. त्याच सोबत हृदयाची बिमारी होऊ शकते.