Health Tips : आरोग्यामध्ये शास्त्राचे महत्त्व काय?, जाणून घ्या..
Health Tips : आरोग्यामध्ये शास्त्राचे महत्त्व काय?, जाणून घ्या.. Health Tips : आरोग्यामध्ये शास्त्राचे महत्त्व काय?, जाणून घ्या..

Health Tips : आरोग्यामध्ये शास्त्राचे महत्त्व काय?, जाणून घ्या..

आरोग्याचे महत्त्व: आयुर्वेदातील सद्वृत्ताचे तीन नियम जाणून घ्या.
Published on

श्रावण म्हणजे उपासनेचा, व्रतवैकल्याचा महिना. व्रत म्हणजे एखादा नियम ठरवून त्याप्रमाणे न चुकता वागणं. सहसा हे नियम आहाराशी संबंधित असतात. त्यामुळे दिवसातून एकदाच जेवणं, रात्री फक्त फळ आहार करणं, एखादा आवडता पदार्थ संपूर्ण महिन्यात वर्ज्य करणं असे नियम आखून घेतात. आपण मात्र आज पाहुयात आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले सद्वृत्तातले, म्हणजे जीवन नैतिकदृष्ट्या जगण्यासाठी घालून दिलेले तीन महत्वाचे नियम.

जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री मिळण्यासाठी, म्हणजेच पैसे कमावण्यासाठी प्रत्येकानी प्रवृत्त व्हावं आणि पैसे कमावण्याचा मार्ग समाज संमत असावा. अर्थात नीतीमूल्य असावा. समाज निंदा करेल असा चुकीचा रस्ताधन प्राप्तीसाठी कधीही निवडु नये.

आपल्या हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीचे आणि अपंग असणाऱ्या व्यक्तींना कमी न लेखता, त्यापेक्षा त्यांच्यासोबत मनमोकळ्यापणाने बोलावे. स्वतःचा तिस्कार न करता, स्वतःचे कौतुक करु नये. त्याबरोबरच नेहमी निरोगी राहावे. आयुर्वेद हे फक्त आरोग्यशास्त्र नाही, तर जगणं शिकवणारी आदर्श जीवन पद्धती आहे, हे यावरून समजतं. आपल्या सर्वांना मिळालेला हा आरोग्य वारसा जपला तर रोगाची भीती राहणारच नाही हे नक्की.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com