सकाळी उपाशीपोटी पाण्यात गूळ आणि लिंबू मिसळून प्या; होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

सकाळी उपाशीपोटी पाण्यात गूळ आणि लिंबू मिसळून प्या; होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

लिंबू आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने आपल्याला असे अनेक फायदे मिळतात. परंतु, या लिंबाच्या पाण्यात गुळाचा एक छोटा तुकडा टाकल्यास ते दुप्पट फायदे देऊ शकतात.

Lemon Water With Jaggery : आरोग्याबाबत जागरूक लोक अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाणी आणि लिंबू पिऊन करतात. लिंबूमध्ये असे पोषक तत्व असतात जे तुमच्या शरीराला पूर्णपणे डिटॉक्स करतात. रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात. लिंबू आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने आपल्याला असे अनेक फायदे मिळतात. परंतु, या लिंबाच्या पाण्यात गुळाचा एक छोटा तुकडा टाकल्यास ते दुप्पट फायदे देऊ शकतात.

सकाळी उपाशीपोटी पाण्यात गूळ आणि लिंबू मिसळून प्या; होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
दह्यात साखर घालावं का मीठ? काय आहे अधिक फायदेशीर? जाणून घ्या आयुर्वेदाचे उत्तर

लिंबू पाण्यात गूळ मिसळून पिण्याचे फायदे

बीपीमध्ये फायदेशीर : बीपीच्या रुग्णांसाठी लिंबू पाण्यात गुळ मिसळून पिणे फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि गुळ या दोन्हीमध्ये पोटॅशियम आढळते, ज्यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे चक्कर येणे आणि डोकेदुखीची समस्याही दूर होते.

प्रतिकारशक्ती वाढवते : लिंबू आणि गुळ या दोन्हीमध्ये भरपूर खनिजे आणि पोषक घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. लिंबू पाण्यात गुळ टाकून प्यायल्यास अनेक प्रकारचे संक्रमण टाळता येते आणि आजारांचा धोकाही कमी होतो.

एनर्जी वाढते : शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू फायदेशीर मानले जाते, तर गुळ शरीराला कार्बोहायड्रेट पुरवतो, ज्याचा वापर आपले शरीर ऊर्जा म्हणून करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात गुळ मिसळून प्यायल्याने ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो.

पचन सुधारते : लिंबू पाण्यात गुळ मिसळून प्यायल्याने आपली पचनक्रिया सुधारते. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, तर गुळ शरीरातील पाचक एंझाइम सक्रिय करतो. हे सकाळी लवकर प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : गुळामध्ये लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि चयापचय वाढतो, ज्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होते.

कसे सेवन करावे?

कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि त्यात गुळाचा छोटा तुकडा घाला. हे तिन्ही घटक चमच्याने चांगले मिसळा. गूळ पूर्णपणे पाण्यात मिसळेपर्यंत ते मिसळा, त्यानंतर तुम्ही ते पिऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com