गर्भसंस्कारामुळे स्त्रीचं आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहत, कसं ते जाणून घ्या
गर्भसंस्काराचा उपयोग फक्त होणाऱ्या बाळापुरता सीमित नसतो. सुरुवातीपासून गर्भसंस्कार केले, तर बाळंतिणीचं आरोग्य सुद्धा सुरक्षित राहतं. सध्या बऱ्याचदा लग्नानंतर लगेचच बाळासाठी प्रयत्न केले जात नाही. यामागे करिअर, आर्थिक स्थिरता वगैरे बरीचशी कारणं असली, तरी एक कारण असंही असतं की नवविवाहित स्त्रीला गर्भधारणा, प्रसूती नंतर वजन वाढण्याची मनात धास्ती असते. बाळ तर हवंय पण फिगर इतक्यात बिघडायला नको अशा विचारातून कुटुंब नियोजनात उगाचंच वाढ केलं जातं.
पण गर्भसंस्कार केलेले असले तर बहुतेक प्रकरणांमध्ये स्त्रीकडे बघून तिला मूळ बाळ झालं असेल असं वाटतही नाही. याचं कारणं असं की, गर्भ संस्कारांची पहिली पायरी असते, स्त्रीचा हार्मोनल बॅवेन्स आणि गर्भाशयाची तयारी. गर्भसंस्कारात गर्भधारणा सहज आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक पद्धतीनी होण्यावर भर दिलेला असतो, अर्थातच त्यासाठी कोणत्याही कृत्रिम हार्मोन्सचा आधार घ्यावा लागत नाही. गर्भधारणेसाठी शरीराची तयारी झालेली असल्यामुळे गर्भवतीला रोज रोज उलट्या, अन्नाची अनिच्छा असे त्रास होत नाही.
गर्भ संस्कारात सांगितल्याप्रमाणे सुरूवातीपासून नैसर्गिक कॅल्शियम, आहार अधिकप्रमाणात आर्यन आणि औषधांची योजना केली तर संपूर्ण नऊ महिन्यात एकही रासायनिक औषध घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे औषध गरम पडलं, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधाचा त्रास सुरू झाला असंही काही घडत नाही. त्यातही आयुर्वेदातील चरक संहितेत सांगितल्याप्रमाणे मासानुमासी म्हणजे प्रत्येक महिन्यात गर्भाचा जसजसा विकास होत असतो. त्यानुसार विशेष आहार घेतला तर, गर्भवतीचं वजन आवश्यक म्हणजे दहा ते बारा किलो इतकच वाढतं आणि प्रसूती नंतर ते पूर्णपणे उतरतं सुद्धा.
गर्भसंस्कार संगीत, सूर्य उपासना यांचा सुरुवातीपासून रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव केला तर स्त्रीची मानसिकता उत्तम राहते. गर्भावस्थेत करावयाच्या विशेष योगासनांमुळे प्राणशक्तीला अधिकाधिक आकर्षित करता येतं, शिवाय सामान्य प्रसूती होण्यासाठी शरीराची तयारी होत जाते. सामान्य प्रसूत होणं हे आई आणि बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे आज संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे. तेव्हा गर्भसंस्कार हे बाळासाठी तर आवश्यक असतातच पण स्त्रीचं आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात.