हाडांची ताकद वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय; जाणून घ्या...

हाडांची ताकद वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय; जाणून घ्या...

हाडांची ताकद वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय जाणून घ्या. अस्थिसंधी वनस्पतीचा उपयोग हाडं जोडण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिसवर उपयुक्त. हाडसांधीचा ताजा रस आणि चूर्ण वापरण्याचे फायदे.
Published by :
Prachi Nate
Published on

निसर्गाचाच एक अविभाज्य भाग असणाऱ्या आपल्या शरीरात आणि निसर्गात अनेक गोष्टी एक सारख्या असतात आणि याचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप कार्यक्षमतेने करून घेतलेला आढळतो. अस्थिसंधी किंवा हाडसांधी नावाची एक वनस्पती असते. हिला पाहून हिचं अस्थि संधी हे नाव किती समर्पक आहे हे समजू शकतं. अक्षरशः छोटी छोटी हाडं एकमेकांवर जोडून ठेवलेली आहेत असं या वेलीकडे बघून वाटतं. दिसायला एकदम आगळीवेगळी पण एकदा बघितली की लक्षात राहणारी आणि त्यामुळे पटकन ओळखू येणारी ही वेल खरोखरच हाडांची शक्ती वाढण्यासाठी आणि तुटलेलं हाड पुन्हा जोडण्यासाठी खूप उपयुक्त असते. 

सध्या कार्यक्षमतेने झालं तर त्यावर लगेच मलम केले जातं पण मणका, बरगड्या वगैरे ठिकाणी कार्यक्षमतेने झालं तर मलम घालता येत नाही किंवा केसांची रेषा कार्यक्षमतेने झालेलं असेल तर त्यावरही मलम घातलं जात नाही. अशा वेळेला हाडसांधी ठेचून तयार केलेला लेप वरून लावल्यानी हाड लवकरात लवकर पूर्ववत होण्यास मदत मिळते. हाडांना ताकद देणारी असल्यामुळे हाड संधी ऑस्टिओपोरोसिसवर ही उपयुक्त असते. यासाठी या वनस्पतीचा ताजा रस अधिक प्रभावी असतो.

दोन चमचे रस सकाळ संध्याकाळ घेण्यानी हाडांची घनतामध्ये सुधारणा होते असं संशोधनमध्ये दिसून आलेलं आहे. अर्थात ताजा रस उपलब्ध नसेल तर हाडसांधीचं चूर्ण घेतलं तरी चालतं. ही वेल लावणं अगदी सोपं असतं. साध्या कुंडीत जरी हाडसांधीचं छोटं कटिंग लावलं तरी ते सहज लागतं आणि वेल बघता बघता पसरते. त्यामुळे मंडळी, पुढच्या वेळेला नर्सरीमध्ये गेलात तर अस्थिसंधीचं छोटं रोप नक्की घेऊन या आणि हाडांच आरोग्य उत्तम ठेवा. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com