Pregnancy : गर्भारपणात मांसधातूचे पोषण; आयुर्वेदाचे मार्गदर्शन
गर्भावस्था म्हणजे जन्माला येणारे आपत्याचा जणू पाया असतो. आपण जितका पाया पक्कं करु तशी इमारत भक्कम उभी राहते. त्याचप्रमाणे जशी भरभक्कम, त्याप्रमाणें गर्भावस्थेत जे पोषण, जे संस्कार मिळतील त्यांचा उपयोग, जन्मानंतर पदोपदी होताना दिसतो. अर्थातच याची सर्वात मोठी जबाबदारी गर्भवती स्त्रीवर असते. म्हणुनच आयुर्वेदाच गर्भवतीच्या आहाराचं तपशील मार्गदर्शन केलेलं आहे.
शरीरातील सप्तधातूंमधला तिसरा धातू असतो मांस धातु. मांस म्हणजे स्थानू असं जरी ढोबळमानानी म्हटलं जात असलं तरी आयुर्वेदाला अपेक्षित असणाऱ्या मांस धातूवर त्वचेचं आरोग्य अवलंबून असतं. अस्थिबंधनची लवचिकता अवलंबून असते. शरीराचा घाट असं ज्याला आपण म्हणतो, तो मुख्यत्वे मांसधातू ठरवत असतो. मांस धातुला जितकं व्यवस्थित पोषण मिळेल, शरीराचं संहनन म्हणजे टोन तितकाच दृढ असतो. चांगली शरीरशक्ती, कामाचायोग्य तग धरण्याची क्षमता
व्यायाम करण्याची उत्तम क्षमता या सर्व गोष्टी मांसधातूशी संबंधित असतात, इतकंच नाही हृदयाचं आरोग्य सुद्धा मांसधातुवर अवलंबून असतं. म्हणूनच गर्भवतीच्या आहारात योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रतीची मांस पोषक आहारद्रव्य असणं, हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतं. यात प्रथम क्रमांकावर असतं A2 दूध. शास्त्रशुद्ध पद्धतीनी बनवलेला शतावरी कल्प टाकून दिवसातून दोन वेळा शुद्ध दूध घेणं चांगलं.
मांसधातूच्या पोषणासाठी घरी बनवलेलं ताजं लोणी सुद्धा उत्तम असतं. संपूर्ण गर्भारपणात, विशेषतः चौथ्या महिन्यात जेव्हा हृदय प्रकर्षानी विकसित होत असतं, तेव्हा रोज चमचाभर ताजं लोणी आणि खडीसाखर हे मिश्रण घेणं चांगलं असतं. खजूर सुद्धा मांस पोषक असतो. खजुराच्या आतली बी काढून त्यात चमचाभर साजूक तूप भरून दिवसातून एकदा किंवा दोनदा खाणं, रोजच्या आहारात मूग, तूर, मटकी, मसूर यापैकी 1-2 कडधान्यं, भिजवलेले चार ते पाच बदाम, एखादा जर्दाळु, 1-2 अंजीर घेणं सुद्धा मांसधातूसाठी पोषक असतं.