Pigmentation: पिगमेंटेशनमुळे चेहरा काळपट का वाटतो? यावर उपाय जाणून घ्या...
कामाच्या धावपळीत आपण आपल्या त्वचेची आणि चेहरऱ्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे चेहऱ्यावर अनेक एलेर्जी होऊ लागतात. अनेक वेळा डोळ्यांखाली काळे डाग निर्माण होणे किंवा चेहऱ्यावर अनेकदा लहान लहान काळे डाग दिसू लागतात. ते डाग नेमके कशामुळे येतात याचा विचार केला आहे का? हे डाग पिगमेंटेशनमुळे येऊ शकतात. पिगमेंटेशन म्हणजे, चेहऱ्यावर काळे डाग येणे यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी दिसू लागते. पिगमेंटेशनलाच हायपरपिग्मेंटेशन असेही म्हटलं जातं. हे पिगमेंटेशन हानिकारक नसले तरी यामुळे अनेक वेळा चेहरा हा चमकदार दिसत नाही आणि त्यामुळे काही वेळा चेहऱ्यावरील सौंदर्य कमी झाल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे त्वचा अस्वस्थ दिसते.
पिगमेंटेशन हे 'या' काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात:
महिलांमध्ये पीसीओडी आणि पीसीओएसची समस्या आढळतात त्यामुळे महिलांच्या शरीरात हार्मोन्स नेहमीच असंतुलीत असतात. तसेच शरीरातील प्रथिन्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यासोबतच त्वचेचे सुद्धा नुकसान होते. प्रथिन्यांच्या कमतरतेमुळे मृतपेशी काढले जात नाहीत ज्यामुळे कमी वयात वृद्धत्व दिसू लागते. ज्यामुळे मेलेनिनचे प्रमाण अधिक वाढते. तसेच कमी आहार, शरीरात पाण्याची कमतरता यामुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. शरीरात पाण्याची कमरता असल्यामुळे डिहायड्रेशनमुळे पिगमेंटेशनची समस्या वाढू शकते. तसेच पुरेशी झोप न घेतल्यामुळे पेशी मृत पडतात आणि त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो.
पिगमेंटेशनवर घरगुती उपाय:
सनस्क्रिमचा वापर करून हे काळे डाग कमी केले जाऊ शकतात.
त्याचसोबत बटाट्याचे बारीक काप करून त्याचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिगमेंटेशनचे काळे डाग कमी होतात.
तसेच मसूर डाळीची पूड करून ती दूधात मिक्स करून तयार झालेली पेस्ट चेहऱ्याला लावल्याने डाग कमी होण्यास मदत होते.
तुळस ही आयुर्वेदिक असते तुळशीच्या पानांचे रस काढून ते चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर तेज येते.