Potato Peel For Skin:बटाट्याची साल सोलून फेकून देताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या...
बटाटा ही अनेक लोकांची आवडती भाजी आहे. बहुतेक सर्व पदार्थांमध्ये बटाटा वापरला जातो. स्नॅक्स असो वा विविध भाजी दिवसभरात बनवल्या जाणाऱ्या एखाद्या पदार्थात तरी बटाटा टाकला जातो. बर्याच लोकांना बटाटे इतके आवडतात की त्यांना प्रत्येक जेवणादरम्यान बटाट्याचा एक ना एक प्रकार खावासा वाटतो. बऱ्याच वेळा बटाट्याचा पदार्थ बनवताना त्याचे साल काढून टाकले जाते. परंतु ते साल फेकून न देता, त्याचा स्किन केअरसाठी वापर केला जावू शकतो. चला तर मग जाणून घेवूया बटाट्याच्या सालीचे फायदे.

बटाट्याच्या सालींमध्ये प्रामुख्याने अॅझेलेक अॅसिड तसेच कॅटेकोलेजसारखे ब्लिचिंग एजंट असते. हे दोन्ही घटक त्वचेसाठी खुप फायदेशीर आहेत. तज्ज्ञांच्या मते, अॅझेलेइक अॅसिड त्वचेची चमक सुधारण्यास मदत करते. तर दुसरीकडे कॅटेकोलेस टॅन आणि डाग काढून टाकून त्वचेला सुंदर बनवते. बटाट्याच्या सालीमुळे त्वचेची लवचिकता वाढते.

या व्यतिरिक्त बटाट्याच्या सालीमध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारे प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी असते जे त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी त्वचेच्या पोषणास मदत करते. तसेच डोळ्यांखाली येणारे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी देखील हे मदत करते.