रुईच्या पानांचे 'हे' आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
रुईची पान पाहिली की पवनपुत्र हनुमानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण रस्त्याच्या कडेला आपोआप उगवणारी रुई हे एक उत्तम आयुर्वेदिक औषधही आहे. जोवर शरीरात प्राण आहे तोवर आपण जिवंत आहोत. चराचरात भरून राहिलेली ही प्राणशक्ती आपल्यापर्यंत कशी येते? तर श्वासावर आरूढ होऊन येते. श्वासात थोडा जरी अडथळा आला तरी प्राण कासावीस होते.
साधी सर्दी झाली आणि नाक बंद पडलं तरी आपण बेचैन होतो.' खोकल्यामुळे रात्रभर झोप आली नाही, काहीतरी औषध द्या ना डॉक्टर' असं कंटाळून सांगणारी कित्येक मंडळी असतात आणि दम्याचा अटॅक आल्यामुळे जीव कसा घाबरतो ते त्या माणसालाच माहित.
इथेच आपल्याला, श्वासातला अडथळा दूर करणारी रुई उपयुक्त पडते. सर्दी खोकला झाला, छातीत कफ जमला तर अगोदर छातीवर थोडंसं तेल लावून, वरून रुईच्या पानांनी शेकण्याने लगेच बरं वाटतं. अगदी दम्याचा अटॅकही यामुळे आटोक्यात येताना दिसतो. तान्ह्या बाळाला तर हा उपचार रामबाण आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)