Skin Care Tips; सुंदर, नितळ आणि चमकदार त्वचा पाहिजे? तर  करा 'हा' उपाय

Skin Care Tips; सुंदर, नितळ आणि चमकदार त्वचा पाहिजे? तर करा 'हा' उपाय

सुंदर, नितळ आणि चमकदार त्वचा हवी आहे? काळे डाग कमी करण्यासाठी दालचिनी आणि लिंबाच्या रसाचा साधा पण प्रभावी उपाय जाणून घ्या. त्वचेची काळजी कशी घ्यावी हे शिकण्यासाठी वाचा.
Published by :
shweta walge
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

आपली त्वचा सुंदर असावी असं कोणाला वाटत नाही? नितळ त्वचा आणि चमकदार रंगाला ग्रहण लागतं ते काळ्या डागांचं. त्यातही जर ते चेहऱ्यावर आले तर काही विचारायची सोय नाही. चला तर आज पाहू या, काळे डाग कमी करण्यासाठी एक साधी पण प्रभावी उपाय.

स्वच्छ धुतलेली सहाण घ्यावी. त्यावर लिंबाचा तीन चार थेंब रस पिळावा. यावर दालचिनी उगाळून लेप तयार करावा आणि तो काळ्या डागांवर लावावा. लेप लावल्यावर तो किती वेळ ठेवावा असा प्रश्न कायम विचारला जातो. याचं मिनिटांमध्ये उत्तर देता येत नाही कारण लेप जाड आहे का पातळ, यावर तो किती वेळेत वाळेल हे ठरणार असतं आणि आयुर्वेदानुसार लेप वाळण्यास सुरुवात झाली की किंवा लेप पूर्ण वाळण्यापूर्वी काढून टाकायचा असतो. 

जर लेप त्वचेवर पूर्णपणे वाळू दिला, तर तो जसजसा वाळतो, तसतशी त्वचा ओढली जाते आणि ते त्वचेसाठी चांगलं नसतं. त्यामुळे लेप पूर्ण सुकण्यापूर्वी पुन्हा एकदा पाण्यानी ओला करावा आणि त्यानंतर हलक्या हातानी काढून टाकावा. वाढत्या वयाचा परिणाम सर्वप्रथम दिसू लागतो तो  त्वचेवर. पण त्वचा घट्ट राहावी, सुरकुत्या येऊ नयेत यासाठी सुद्धा दालचिनी उपयुक्त असते. यासाठी सहाणेवर थोडं दूध घ्यावं. त्यात चंदन उगाळून अर्धा चमचा तयार करावी. अजून थोडं दूध घेऊन त्यात दालचिनीची एक अष्टमांश चमचा पेस्ट तयार करावी. 

या दोन्ही पेस्ट नीट मीक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लेप लावावा. मघाशी म्हटल्याप्रमाणे पूर्ण सुकण्याआधी लेप काढून टाकावा. उष्ण वीर्याची असल्यामुळे दालचिनीच्या पेस्टमुळे संवेदनशील त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा जाणवू शकतो. असं झालं तर त्यावर पटकन थोडं घरी बनवलेलं साजूक तूप लावावं आणि पुढच्या वेळेला चंदनाचं प्रमाण वाढवावं किंवा लेप पातळ लावावा. 

त्वचा सुंदर आणि निरोगी रहावी यासाठी आहारात घरचं लोणी, साजूक तूप यांचा नियमित समावेश करणं चांगलं असतं. फार आंबट, मसालेदार किंवा तिखट, तळलेल्या गोष्टींपासून दूर राहणं,  त्याऐवजी वरण-भात, पोळी किंवा भाकरी, साधी फोडणी घातलेली फळभाजी, कोशिंबीर, जेवणानंतर ताज ताक असा साधा, सात्विक आहार घेणं श्रेयस्कर असतं. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com