पोटदुखी थांबवण्याचे हे घरगुती उपाय, जाणून घ्या...

पोटदुखी थांबवण्याचे हे घरगुती उपाय, जाणून घ्या...

आपल्या दिवसभरातील सगळी धडपड ही मुख्यत: पोटासाठीच चालली असते.
Published by  :
Team Lokshahi

आपल्या दिवसभरातील सगळी धडपड ही मुख्यत: पोटासाठीच चालली असते. आपण जे कमावतो ते धडपड करतो त्या सगळ्यांना मागचा प्रमुख आपले आणि आपल्या कुटुंबाचे तोच व्यवस्थित भरले जावे हाच असतो. अगदी आदिमानवापासून आपण इतिहास काढून बघितला तर पोट भरणे ह्या एकाच प्रमुख हेतूवर तेव्हा आपले जीवन केंद्रित होते. तेव्हा कंदमुळं, झाडाची पाने, कच्चे मांस असल्या गोष्टींनी आपण आपले पोट भरायचो हळूहळू त्यात अजून सुधारणा होऊन आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ वेगवेगळे मसाले वापरून तयार करू लागले. जसजशी आपली खाण्याची ही प्रगती होत गेली तसतशी आपल्या पोटाच्या समस्या सुद्धा वाढत गेल्या आता तर पोटात दुखणे ही अगदी सामान्य समस्या झाली आहे.

1. लिंबू

लिंबाचा रस आल्याच्या रसात घालून सकाळी उठल्यावर प्यायला तर पित्ताच्या त्रासाने होणारी पोटदुखी अगदी लगेच थांबते आणि आराम मिळतो. लेमन टी सुद्धा पोटदुखीवर एक चांगला उपाय आहे त्यानेसुद्धा पोटाचे दुखणे थांबण्यास मदत होते.

2. आलं

आल्याचा रस काढून त्याचा हलका मसाज पोटावरून केला तर पोटाचे दुखणे । लगेच थांबते. आत्याचा रस जर लिंबाच्या रसासोबत घेतला तर त्याने सुद्धा पोटदुखी थांबते.

3. पुदिना

पुदिन्याच्या रसाचा उपयोग पोटदुखीवर सुद्धा केला जातो. पुदिन्याच्या औषधी गुणधर्मामुळे पोटदुखीवर बनवल्या जाणाऱ्या अनेक काव्यामध्ये पुदिन्याचा रस वापरतात.

4. सोडा

सोडा पोटदुखीसाठी सुद्धा रामबाण उपाय आहे. तुटला सोडा प्यायल्याने सुद्धा पोटदुखी कमी होते. सोड्यात आल्याचा किंवा लिंबाचा रस घातला तर त्याचा औषधी गुणधर्म अजूनच वाढतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com