‘या’ लोकांनी चुकूनही साबुदाणा खाऊ नये

‘या’ लोकांनी चुकूनही साबुदाणा खाऊ नये

साबुदाणा सर्वजण उपवासात खातात.
Published by :
Siddhi Naringrekar

साबुदाणा सर्वजण उपवासात खातात. तसेत सर्वांनाच साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते. यातून शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेटही भरपूर प्रमाणात असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी साबुदाणा खाऊ नये. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा खाणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हृदयविकार असेल तर साबुदाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. साबुदाण्याच्या अति खाण्याने अॅसिडीटीचा त्रास जाणवतो.

साबुदाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त नसतो, परंतु जर तुम्ही दररोज सेवन केले तर ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवेल. ज्यांना आधीच थायरॉईड आहे त्यांनी साबुदाणा जास्त खाऊ नये. साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, डोकेदुखी आणि थायरॉईड वाढण्याची समस्या होऊ शकते.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com