फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य; जाणून घ्या

फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य; जाणून घ्या

फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याने तुमच्या आरोग्याला काय हानी पोहोचू शकते आणि कोणती फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळले पाहिजे जाणून घ्या.

Health Tips : फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका, असे अनेकदा तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल. जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर 1 तासानंतरच प्यावे, असेही सांगितले जाते. यामागील आता अनेक वैज्ञानिक कारणे समोर आली आहेत. फळ खाल्यानंतर पाणी पिल्यामुळे आरोग्याला अनेक हानी पोहोचू शकतात. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याने तुमच्या आरोग्याला काय हानी पोहोचू शकते आणि कोणती फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळले पाहिजे जाणून घ्या.

फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य की अयोग्य; जाणून घ्या
निपाह व्हायरसचा फैलाव! वेळीच 'ही' लक्षणे ओळखा

फळ खाल्यानंतर पाणी का पिऊ नये?

- तज्ज्ञांच्या फळांमध्ये फ्रक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखर असते, अशा परिस्थितीत फ्रक्टोजयुक्त पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर किमान 1 तास आधी किंवा 1 तासानंतर पाणी प्यावे.

- फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटात अन्न नीट पचत नाही, त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते

ही फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका

केळी

तज्ज्ञांच्या मते, केळी खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास सक्त मनाई आहे. कारण केळी खाल्ल्यानंतर पाणी, विशेषतः थंड पाणी पिल्याने अपचन होऊ शकते. याला इंडायझेशन म्हणतात. वास्तविक, केळी आणि थंड पाण्यात सारखेच गुणधर्म असतात जे शरीरात भिडतात आणि त्यामुळे अपचन होऊ शकते. केळी खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनीच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पेरू

अनेकदा पेरू खाल्ल्यानंतर खूप तहान लागते आणि नुसते घोटून एक ग्लास पाणी प्यावेसे वाटते, परंतु असे करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो.

काकडी आणि टरबूज

काकडी आणि टरबूज सारखी पाणीदार फळे पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ओळखली जातात, परंतु जर तुम्ही ते खाल्ल्यानंतर लगेच भरपूर पाणी प्याल तर त्यामुळे पोट खराब होऊ शकते. तुम्हाला लूज मोशनची समस्याही उद्भवू शकते.

संत्री, अननस आणि द्राक्षे

सायट्रिक अ‍ॅसिड असलेली फळे खाल्ल्याने आधीच पाण्याचे प्रमाण जास्त होते आणि त्यानंतर जेव्हा आपण पाणी सेवन करतो तेव्हा आपल्या शरीराची पीएच पातळी बिघडते आणि अपचन सारख्या समस्या होण्याची शक्याता असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com