Monsoon Tips : पावसाळ्यात दमट कपड्यांमुळे त्वचेला खाज आणि रॅश येतात? मगं 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

Monsoon Tips : पावसाळ्यात दमट कपड्यांमुळे त्वचेला खाज आणि रॅश येतात? मगं 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

पावसाळ्यात कपडे नीट वाळत नाहीत आणि ओलसर कपड्यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. याच्यामुळे त्वचेवर खाज येते ती खाज कमी करण्यासाठी यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा.
Published by :
Prachi Nate

पावसाळा म्हटलं की हिरवळ, गारवा आणि हवेतला तो प्रसन्नपणा आठवतो. पण या सुंदर ऋतूचे काही त्रासदायक पैलूही आहेत, विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने. पावसाळ्यात कपडे नीट वाळत नाहीत आणि ओलसर कपड्यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अनेकांना गुप्तांगांभोवती खाज येणे, मांड्यांमध्ये चोळ लागणे, त्वचेवर रॅश उठणे असे त्रास जाणवतात. ही लक्षणं दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता काही सोपे घरगुती उपाय करणे गरजेचे आहे. हे उपाय तुमच्या त्वचेला तात्काळ आराम देतात आणि भविष्यातील त्रासही टाळतात.

1. कपडे कोरडे करा आणि मोकळे घाला

ओलसर कपडे त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असतात. कपडे घालण्यापूर्वी ते पंख्याखाली किंवा इस्त्रीने कोरडे करून घाला. शक्य असल्यास सैलसर, कॉटनचे कपडे वापरा जेणेकरून हवा फिरते आणि खाज टळते.

2. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब वापरा

दररोजच्या अंघोळीत कडुलिंबाचे पाने उकळून घेतलेले पाणी वापरा. हे पाणी जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट करून त्वचा संक्रमणापासून संरक्षण करते.

3. खाज येणाऱ्या भागावर खोबरेल किंवा बदाम तेल

अंघोळीनंतर शरीर पूर्णपणे कोरडे करा आणि खाज येणाऱ्या ठिकाणी थोडंसं खोबरेल किंवा बदाम तेल लावा. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि रॅश किंवा चिळचिळ कमी होतो.

4. खास वॉशचा वापर करा

महिलांनी सामान्य साबणाऐवजी गुप्तांग स्वच्छतेसाठी खास वॉश वापरावा. हे pH-बॅलन्स्ड असल्याने त्वचेच्या नाजूक भागांवर परिणाम होत नाही आणि ओलसरपणामुळे होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.

5. सतत खाजवू नका, पाणी वापरा

खाजवल्यामुळे त्वचेवर जखम होऊ शकते. खाज येत असल्यास थंड पाण्याने जागा धुवा आणि हवेशीर ठेवा. खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com