दात न घासता पाणी पिणे योग्य आहे का? जाणून घ्या
Health Tips : शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पोटाच्या अनेक आजारांसाठी आणि स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते, दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे. पण, बरेच लोक सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पितात. पण, अनेकदा हे चुकीचे असल्याचे सांगितले जाते. आज आपण हे जाणून घेणार आहोत की असे करणे योग्य आहे का?
ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे
पचन चांगले होते
जर तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी पिलं तर तुमची पचनशक्ती चांगली राहते. तसेच, तुमचे अन्न सहज पचते. शरीरात साचलेले अनेक आजार जसे आळस येणे, मुरुम येणे, पोटाचे आजार, अपचनाची समस्या, शरीरातील घाण निघून जाते.
सकाळी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे
झोपेच्या वेळी म्हणजे 7-8 तासांच्या दरम्यान आपण पाणी पीत नाही. अशा स्थितीत तुम्ही सकाळी सर्वात आधी पाणी प्यावे जेणेकरुन तुमचे शरीर आधी हायड्रेटेड होते.
तोंडात बॅक्टेरिया जमा होत नाहीत
ब्रश करण्यापुर्वी पाणी पिल्याने तोंडातील सर्व बॅक्टेरिया निघून जातात.
प्रतिकारशक्ती वाढते
ब्रश करण्यापुर्वी पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी किंवा खोकला लवकर होणार नाही. यामुळे केसही निरोगी राहतात. तसेच, उच्च रक्तदाब आणि डायबिटीससारखे आजार टाळता येतात. यासोबत लठ्ठपणासारख्या समस्या टाळता येतात. वजन कमी करायचे असेल तर ब्रश करण्यापुर्वी पाणी जरूर प्या.
दुर्गंधी
कोरड्या तोंडामुळे श्वासाची दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी उठून ब्रश करण्यापुर्वी पाणी प्यायले तर तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. जर तुम्ही गरजेनुसार पाणी पीत नाही तेव्हा तोंडाच्या दुर्गंधीची समस्या उद्भवते, त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावे.